Saprem Dya Niropa | Arati Prabhu [Chintamani Khanolkar] | Marathi Kavita

सप्रेम द्या निरोप | Saprem Dya Niropa

तो एक वृद्ध माळी
गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाय
आता पडून आहे

गुंफून शेज त्याची
हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगय्राचा
पानी मिटून आहे

अंगावरी कळ्यांची
पसरून शाल गेला
सारा गुलाब आता
रोखून श्वास आहे

जाईजुई बसून
कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद
हूरहूर बोलताहे

वनवेळू वाजताहे
एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी
निश्वास टाकताहे

वाजून मेघ जातो
घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून
गंभीर नाद आहे

बोले अखेरचे तो
आलो ईथे रिकामा
‘सप्रेम द्या निरोप,
बहरून जात आहे’

_आरती प्रभूChintamani Tryambak Khanolkar
(8 March 1930 – 26 April 1976)
He writes all poems under name ‘Arati Prabhu’.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MKS Comments

comments

Talya Kathi | Anil | Marathi Kavita

मराठी …From Wikipedia, the free encyclopedia