Anamveera | Kusumagraj | Marathi Kavita

Kusumagraj – Vishnu Vaman Shirwadkar.
(Born: 27 February 1912, Died: 10 March 1999)

अनामवीरा

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

__कुसुमाग्रज [By Kusumagraj]

Comments

Leave a Reply
  1. लहानपणी ही कविता गुरुजी म्हणयचे तेव्हा अर्थ कलत नसे. आज पुन्हा वाचण्याचा योग आला तर अश्रु ओघालले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MKS Comments

comments

मराठी …From Wikipedia, the free encyclopedia

Dolyatalya Dohamadhe Poems by Vinda Karandikar | डोळ्यांतल्या डोहामध्ये

Dolyatalya Dohamadhe Poems by Vinda Karandikar | डोळ्यांतल्या डोहामध्ये