Tujhya Gala Majhya Gala Lyrics Marathi kavita तुझ्या गळा, माझ्या गळा

Tujhya Gala Majhya Gala Lyrics Marathi kavita तुझ्या गळा माझ्या गळा

तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा
ताई, आणखी कोणाला?
चल रे दादा चहाटळा!
तुज कंठी, मज अंगठी!
आणखी गोफ कोणाला?
वेड लागले दादाला!
मला कुणाचे ? ताईला!
तुज पगडी, मज चिरडी!
आणखी शेला कोणाला?
दादा, सांगू बाबांला?
सांग तिकडच्या स्वारीला!
खुसू खुसू, गालि हसू
वरवर अपुले रुसू रुसू
चल निघ, येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू.
कशी कशी, आज अशी
गंमत ताईची खाशी!
अता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी?
_भा. रा. तांबे

What do you think?

0 points
Upvote Downvote

Pratham Tujha Pahata Lyrics | G D Madgulkar | Marathi Song Lyrics

Ala Kshan Gela Kshan by Kavi keshavasut | आला क्षण-गेला क्षण

Ala Kshan Gela Kshan by Kavi keshavasut | आला क्षण-गेला क्षण