सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या.. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.
Aga Vaikunthichya Raya by Sant Kanhopatra
अगा वैकुंठीच्या राया।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा।
अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥
Nako Devaraya Anta Aata by Sant Kanhopatra Santwani
नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा
तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई
मोकलूनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयांत
कान्होपात्रा यांचे फक्त ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. कान्होपात्रा यांचे इ.स. १७७७ मध्ये बसवलिंग यांनी लिहिलेले एक ओवीबद्ध चरित्र जानेवारी २०१५ मध्ये सापडले आहे.
Ref: Wikipedia