Sant Muktabai Santwani – संतवाणी

मुक्ताबाई (जन्म: आळंदी, महाराष्ट्र, इ.स.1201 — मृत्यू: मेहूण (जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आपला भाऊ संत ज्ञानेश्वरांना बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत. योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरु मानले होते. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनांती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.

[mk_fancy_title size=”20″ font_family=”none”]Sant Muktabai Abhang | संत मुक्ताबाई अभंग[/mk_fancy_title]
[vc_accordions]

Mungi Udali Aakashi by Sant Muktabai

मुंगी उडाली आकाशीं।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥

थोर नवलाव जांला।
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥

विंचु पाताळाशी जाय।
शेष माथां वंदी पाय ॥३॥

माशी व्याली घार झाली।
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥

Yogi Pavan Manacha by Sant Muktabai

योगी पावन मनाचा।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्‍त्रे झाले क्लेश।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रह्म, दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

[/vc_accordions]

जन्म – आश्विन शुद्ध प्रतिपदा(घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा – मातापित्यांचा देहत्याग – ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद – विसोबा खेचर शरण आले – शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. – ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी – ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती – मुक्ताबाईने चांगदेवाना ‘पासष्टी’चा अर्थ सांगितला. – मुक्ताबाईचा पहिला शिष्य – चांगदेव – नामदेवांची भेट – गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव – अमृत संजीवनीची प्राप्ती – चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान – निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास – तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट – ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) – सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) – चांगदेवांची समाधी (पुणतांबे) – आपेगावी मुक्काम – वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम – ‘ज्ञानबोध’ ग्रंथाची निर्मिती – तापीतीरी स्वरूपाकार झाली.

मुक्ताबाईचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य आहे. हिची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.

What do you think?

8 points
Upvote Downvote

रणी फडकती लाखो झेंडे (Ranni fadakati Lakho Zende)

Sant Kanhopatra Santwani - संतवाणी

Sant Kanhopatra Santwani – संतवाणी