Kase Sartil Saye | Sandeep Khare | Diwas Ase Ki | Marathi Kavita

कसे सरतील सये | Kase Sartil Saye
Sandeep Khare
(Born: 13 May 1973, Pune, Maharashtra)
Album: Diwas Ase Ki
Music and lyrics: Sandeep Khare
Singer: Sandeep Khare

कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे?
सरताना आणि सांग सलतील ना !

गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! …..

पावसाच्या धारा धारा ….. मोजताना दिसं सारा
रिते रिते मन तुझे उरे …..
ओठभर हसे हसे….. उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे?
आता जरा अळिमिळी
तुझीमाझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! …..

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ….. सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! …..

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ….. काचभर तडा !
तूच तूच ….. तुझ्या तुझ्या ….. तुझी तुझी ….. तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! –
पडे माझ्या वाटेतून
आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना ! …..

आता नाही बोलायाचे ….. जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ….. विजेवर झुलू देत
तुझ्यामाझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! …..

_ संदीप खरे

What do you think?

0 points
Upvote Downvote

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Megh Nasta Veej Nasta | Sandeep Khare | Namanjoor | Marathi Kavita

Aai Bhavani Tujhya Krupene | Ajay-Atul | Savarkhed Ek Gaon | Movie Lyrics | Marathi Kavita | आई भवानी

Aai Bhavani Tujhya Krupene | Ajay-Atul | Savarkhed Ek Gaon | Movie Lyrics | Marathi Kavita | आई भवानी