Shaarad Sundar Chanderi Raati Lyrics by Shanta Shelke

Enjoy Shaarad Sundar Chanderi Raati Lyrics by Shanta Shelke. Sharad Sundar Chanderi rati song sung by Asha Bhosle. Music composed by Hemant Bhosle.

गीतकार : शांता शेळके
गायक : आशा भोसले
संगीतकार : हेमंत भोसले

Shaarad Sundar Chanderi Raati Lyrics in Marathi:

शारद सुंदर चंदेरी राती
स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत
साजणा झुलव मला

साजणा रे, मोहना रे
ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगे सोयरे मी सांडिले पाठी

मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतीची हीच ना रिती
कशाला कुणाची भिती

झाडामागे चांद हा वरती आला
ये ना, ये ना, आतूर जीव हा झाला
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे

वाऱ्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जीवाला करिती धूंद

माझ्या देही पूनव चांदणे साजे
प्राणामध्ये प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धूंद काया, मोह वाया

साजणा रे, मोहना रे
ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगे सोयरे मी सांडिले पाठी

शारद सुंदर चंदेरी राती
स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत
साजणा झुलव मला

_शांता शेळके

What do you think?

1 point
Upvote Downvote

Chepen Chepen | Sandeep Khare | Ayushyavar Bolu Kahi | Marathi Kavita

Kashi tujh samajau sang | B B Borkar | Marathi Kavita