Shravanat Ghan Nila Song Lyrics | Marathi Poems

Shravanat Ghan Nila Song Lyrics | Marathi Poems

Lyrics: Mangesh Padgaonkar
Music: Shrinivas Khale
Singer: Lata Mangeshkar
Album: Rutu Barva
Bhavgeet

श्रावणात घन निळा बरसला
रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित
हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली
ते सुख आले दारी
जिथेतिथे राधेला भेटे
आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले
नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले
हे स्वप्‍नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती
थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत
आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी
ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे
फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला
गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या
कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत
शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला
नाही आज किनारा

What do you think?

3 points
Upvote Downvote

Ghungur | Pu La Deshpande | Marathi Kavita

Neej Mazya Nandlala Lyrics | नीज माझ्या नंदलाला | Mangesh Padgaonkar

Neej Mazya Nandlala Lyrics | नीज माझ्या नंदलाला