Mi fasalo mhanuni | Sandeep Khare | Lyrics | Marathi Kavita

Mi Fasalo Mhanuni | Damalelya Babachi Kahani | Marathi kavita Sandeep khare

मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

_ संदीप खरे [by Sandeep Khare]

[संदीप : या कवितेविषयी थोडंसं सांगतो…की हातामधून हात सुटून जातो, …………….
पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ……….
ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. ……
आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता ]

What do you think?

1 point
Upvote Downvote

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MKS Comments

comments

Ek hoti thammabai | Pu La Deshpande | Marathi Kavita

Ka Kalena Konatya Kshani | Mumbai Pune Mumbai | Marathi Song Lyrics

Ka Kalena Konatya Kshani | Mumbai Pune Mumbai | Marathi Song Lyrics