Hanuman Bhajan Lyrics | हनुमान भजन | Hanuman Jayanti

Enjoy Hanuman Bhajan Lyrics हनुमान भजन from Geet Ramayan! Asa Ha Ekach Shri Hanuman Song Lyrics and Anjanichya Suta Tula Song Lyrics penned by G.D. Madgulkar. A song sung by Sudhir Phadke. A Music composed by Sudhir Phadke.

Asa Ha Ekach Shri Hanuman Bhajan Lyrics in Marathi:

तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्‌

भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुडाहुन बलवान्‌

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्‌

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्‌

बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्‌

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें
कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्‌

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्‌

शस्‍त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपला दिनमणी
चिरतर आयुष्मान्‌

करि हनुमन्ता, निश्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण


Anjanichya Suta Tula Lyrics in Marathi:

अंजनीच्या सुता
तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला,
बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती,
भव्य तुझी काया
बालपणी गेलासी
तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी,
थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मूर्च्छा
लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया
केले तू उड्डाण
तळहातावर आला
घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी
गाठलीस लंका
तिथे रामनामाचा
तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे
परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्‍नांचा
जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती
राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती
दाविले प्रभु भगवान

आले किती, गेले किती,
संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे
अजुनी दरारा
धावत ये लवकरी,
आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य,
धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे
उपाशी का देवा ?
घे बोलावून आता
कंठाशी आले प्राण


What do you think?

0 points
Upvote Downvote
Ram Janmala Ga Sakhi Lyrics | राम जन्मला गं सखी | G.D. Madgulkar

Ram Janmala Ga Sakhi Lyrics | राम जन्मला गं सखी

Ek Hoti Aaji Marathi Poems for Kids

Ek Hoti Aaji Marathi Poems for Kids