Birbalchi Yukti 2 – Akbar Birbal Stories in Marathi

बिरबलची युक्ती Birbalchi Yukti Akbar Birbal Stories in Marathi -2

एकदा एका  फकिराने बादशाहाला  एक पोपट भेट दिला. पोपट चांगल्या गाणाऱ्या जातीचा होता. बादशाहाने पोपटा कडून पुराणातील काही महत्वाचा भाग, उर्दू कविता आणि काही सुंदर वाक्य पाठ करवून घेतली होती. पोपटाच्या सेवेसाठी खास एका सेवकाची नेमणूक केली होती. पोपट सोनेरी पिंजर्यातल्या झोक्यावर झोके घेत असलेला पाहून बादशाहाला खूप आनंद होई. त्याच्या तोंडून उर्दू कविता ऐकण्यात बादशाहाला काही वेगळीच मजा वाटे.

पोपट बादशाहाचा अतिशय आवडता होता. पोपटाला काही दुखले खुपलेले किंवा त्याच्या सेवेत काही कमी पडलेले बादशाहाला मुळीच आवडत नसे. लगेच तो सेवकाला दम भरीत असे.

एका दिवसाची गोष्ट, सेवक बादशाहाला पोपटाची प्रकृती बरी नसल्याबद्दल सांगू लागला. बोलणे पूर्ण होण्याच्या आत त्याच्या मुस्काटीत भडकावली आणि तो म्हणाला, “हे बघ पोपटाची देखभाल करण्यासाठी मी तुला नेमले आहे. पोपटाला काही होता कामा नये. पोपट मेला असे सांगण्यासाठी आला तर मी तुझे डोके उडवू टाकेल. समजल!”

सेवक घाबरला. तो पोपटाची चांगली काळजी घेवू लागला परंतु पोपटाला काही न काही होत असे. सेवक मात्र घाबरून जाई. असेच दिवस जात होते. एक दिवस पोपट आजारी पडला आणि त्याच्या घशातून आवाज निघेना. त्याने आपले पंख शरीर भोवती लपेटून घेतले आणि त्याची चोच वाकडी झाली. सेवक त्याला औषधे देत होता. तरीपण पोपट बरा होत नव्हता.

बादशाहा आपल्या काही महत्वाच्या कामात मग्न होता. त्याचे पोपटाकडे लक्ष न्हवते. बघता बघता पोपट पिंजऱ्यात उताणा पडला. त्याने आपले पंख ताणून पसरले. चोच उघडली गेली. पोपट मेला असल्याचे सेवकाच्या लक्षात आले. परंतु राजाला हे सांगणे शक्यच नव्हते. सेवक घाबरला त्याने बिरबलाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली. बिरबलाने सेवकाला धीर दिला. त्याने स्वत: पोपटाची परिस्थिती पहिली.

सेवकाच्या पाठीवर थोपटून तो म्हणाला ठीक आहे. मी बघतो सगळ, तू घाबरू नकोस. बिरबल बादशहाकडे आला आणि म्हणाला सरकार आपला गुणी पोपट अलीकडे खूप गुणी झाला आहे. पहावा तेह्वा परमेश्वराचे ध्यान करत असतो. अहो आज तर केव्हापासून तो परमेश्वरच्या चिंतनात मग्न आहे. बादशहा बिरबलासोबत पोपटाच्या पिंजऱ्याजवळ आला, पाहतो तर काय पोपट मारून पडलेला. तो बिरबलाकडे वळून म्हणाला बिरबल तू तर किती मूर्ख आहे. अरे हा पोपट तर मरून पडला आहे. नाही सरकार पोपट मेलेला नाही परमेश्वरच्या चिंतन करता करता त्याचा आत्मा परमेश्वराकडे कायमचा निघून गेला.

सेवकाला त्याला झाडाच्या बुंध्याशी पुरून द्यायला सांगा. म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती भेटेल. बादशहाच्या लक्षात आली बिरबलाची युक्ती. पोपट मेला अस सांगायला आलास तर तुझ डोक उडवीन असे सेवकाजवळ बोलल्याचे बादशहाला आठवले. बिरबलाच्या युक्तीने सेवकाचा प्राण वाचवला होता. बादशहा गालातल्या गालात हसला आणि बिरबल बरोबर निघून गेला.

What do you think?

11 points
Upvote Downvote
Ganapati Aarti in Marathi | श्री गणपति आरती संग्रह | Ganesh Aarti

Pranamya Sirasa devam | Ganesh Stotra | Ganpati Aarti

Ganesh Chalisa | Ganesh Aarti | गणेश चालीसा

Ganesh Chalisa | Ganesh Aarti | गणेश चालीसा