Kalyanchi Phule Kashi Jhali Poems By Ram Ganesh Gadkari

Kalyanchi Phule Kashi Jhali Poems By Ram Ganesh Gadkari कळयांची फुलें कशी झाली

Kalyanchi Phule Kashi Jhali Poems By Ram Ganesh Gadkari कळयांची फुलें कशी झाली?

बाळ कुणी । संध्याकाळी रमे गुणी॥
खेळतसे । बाळ अंगणी हवें तसें॥
बागेंत । मौजेनें झोंके घेत॥
तों दिसली ! सुंदरशी त्याला वेली॥
देठ कोंवळे । हिरवे पिवळे । नाजुक सगळे॥
ती वेलीं । हिरवा शालू पांघरली॥ 1॥

परी तया । हवा सोबती खेळाया॥
खेळगडी। मूल फूल सुंदर जोडी॥
पाहतसे। परि वेलीली मूल नसे॥
तिच्या कळया । होत्या मिटलेल्या सगळया॥
जणुं दमल्या । फार खेळुनी; मग निजल्या॥
हवेंत डुलणें । हेंच खेळणें । खेळुनि निजणें॥
ही त्यांची । गादी हिरव्या पानांची॥2॥

बाळ गुणी । वाइट वाटे फार मनीं॥
दिवसभरी । खेळुनि आला परत घरीं॥
झोपेंत । कितिदां गेला बागेंत॥
धीर कुठें? पहांट होता बाळ उठे॥
बागेंत धाव तसाची तो घेत॥
मौज तों किती । कळया न दिसती । फुलेंच हंसती॥
बाळ डुले । चहूंकडे पाहून फुलें॥ 3॥

आईला । शोधाया धांवत गेला॥
मग बोले । ”आई ! बघ हीं गोड फुलें॥
काल कळया । आज फुलें झाल्या सगळया॥
कशा उमलल्या ? कुणीं हंसविल्या ? हांसत बसल्या॥
कशा कळया? आई सांग मला, सगळया ?”॥ 4॥

मग आई । बाळाला उत्तर देई॥
खेळासी। जमति चांदण्या आकाशीं॥
त्या हंसती । चहूंकडे पाहत बसती॥
तों दिसल्या । कळया बिचार्या हिरमुसल्या॥
कळवळल्या । फार चांदण्या मग रडल्या॥
आंसूं पडले । ते देव झाले । धांवत आले॥
भुईवरी । पडले सार्या कळयावरी॥ 5॥

तो साचा। रंग पांढरा तारांचा॥
कळयांवरी । चहूकडे जाउनि पसरी॥
मग हंसल्या। कळया फुलें हंसतां झाल्या”॥
सर्व असें । आई बाळा सांगतसे॥
ऐकुनि हें । बाळ तिच्या वदना पाहे॥
कां न कळे । मिठी मारिली तिला बळें॥
त्या काळी । आई आनंदें हंसली॥
हंसता रडली । असवें पडलीं । त्याच्या गालीं॥
तों साची । कळी उमलली बाळाची !॥ 6॥

_राम गणेश गडकरी

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MKS Comments

comments

Aabhas Ha Lyrics by Ashvini Shende | Yanda Kartavya Aahe | Movie Song Lyrics

Aabhas Ha Lyrics by Ashvini Shende | Yanda Kartavya Aahe | Movie Song Lyrics

Banu baya Lyrics | Jai Malhar | Zee Marathi | Marathi Serial Lyrics

Banu baya Lyrics | Jai Malhar | Zee Marathi