Nako Asatanaa Spruha Joshi Kavita

Nako Asatanaa Spruha Joshi Kavita

Nako Asatanaa - Spruha Joshi Kavita

Nako Asatanaa Spruha Joshi Kavita

नको असताना..
काही आवाज पडत राहतात कानावर
गिरमिटत राहतात आठवणींचे तुकडे एकमेकांवर
रिक्षांची इंजिनं, बसचे भोंगे,
हवालदाराची शिट्टी, देवळातल्या घंटा,
मशिदीतली अजान, कर्कश्श्य फिल्मी गाणी,
फेरिवाल्यांच्या बोंबा, कोळणींच्या शिव्या, ट्रेनमधली भजनं
आणि तारस्वरात माझ्या आतून आक्रंदणारं लहानसं बाळ!
सगळे एकत्र अतिक्रमण करतात
आतल्या शांततेवर.
मला खरंतर खूप ओरडायचं असतं
आतलं शांत गाव शोधायचं असतं..
मग मी अट्टाहासाने कान बंद करते,
शांततेच्या गावात हळूहळू शिरायला लागते..
पण विचित्र होतं नंतर सारं..
अनेक प्रश्न अंगावर येतात शांतपणे,
घायाळ करतात, रक्त काढतात अगदी शांतपणेच!
माझ्या आतलं लहान बाळ
आता आणखीनच घाबरतं,
कर्कश्श्य शहरात पुन्हा यायला धडपडतं.
शहर भिनलंय त्याच्यात पुरतं..
हल्ली रोज वेडं फक्त एकच सांगतं,
‘शांततेचा आवाजच सगळ्यात भीषण’

Abeer Gulal Udhalit Rang Lyrics | Sant Chokhamela | Pt Jitendra Abhisheki

Abeer Gulal Udhalit Rang Lyrics | Sant Chokhamela | Pt Jitendra Abhisheki

Tu Majha Saangaati Title Song Lyrics from Colors Marathi | तू माझा सांगाती

Tu Majha Saangaati Title Song Lyrics | Colors Marathi