Sadhumaharaj Wagh Marathi Story / साधुमहाराज वाघ

Marathi Goshti

साधुमहाराज वाघ

एका जंगलात एक वाघ राहत होता. तो आता म्हातारा झाला होता. त्याच्यातली ताकत संपली होती. त्याने विचार केला,” मी आता काही शिकार करू शकणार नाही. माझे पोट भरण्यासाठी मला आता काही तरी युक्ती केली पाहिजे.”

वाघाने खूप विचार केला. त्याला एक झकास कल्पना सुचली. त्याने जाहीर केले,” मी आता खूप म्हातारा झालो आहे. आता उरलेले आयुष्य मी धार्मिकपणे जगणार आहे. मी यापुढे फक्त गवत आणि फळे खाईन. सतत देवाचा जप करीन. जंगलातल्या पशुपक्ष्यानी आता मला अजिबात घाबरायचे नाही.”

वाघाच्या शब्दांवर काही भोळ्याभाबड्या प्राण्यांचा विश्वास बसला. ते म्हणाले,” किती महान संत आहे हा!आपण त्याला भेटला पाहिजे. त्याचा दर्शन घेतला पाहिजे.”

मग दररोज काही प्राणी वाघाला भेटायला त्याच्या गुहेत जाऊ लागले. वाघ त्या भोळ्याभाबड्या प्राण्यांवर झडप घालत असे.  त्यांना मारून खात असे. अश्या प्रकारे तो म्हातारा वाघ आपले पोट भरू लागला.

एके दिवस कोल्ह्याला या साधुमहाराज वाघांबद्दल कळले.  तो मनात म्हणाला,”वाघ कसा काय गवत आणि फळे खाऊ शकेल? माझा यावर विश्वास नाही. मी स्वतःच जाईन. खरे काय त्याचा शोध घेईन. ”

दुसऱ्याच दिवशी कोल्हा वाघाच्या गुहेकडे निघाला. गुहेच्या दरवाजापाशी तो थांबला. त्याने पहिले कि, गुहेत गेलेल्या प्राण्याच्या पावलाचे ठसे जमिनीवर उमटले होते.  कोल्ह्याने त्या ठशांचे बारकाईने निरीक्षण केले. त्याला फक्त गुहेत जाणाऱ्या पावलांचे ठसे दिसले. पण गुहेतून बाहेर येणाऱ्या प्राण्यांचे ठसे आढळले नाहीत. तो म्हणाला,”या ढोंगी साधुमहाराजाला जिवंत ठेवण्यासाठी मी नाही माझा जीव देणार!” आणि कोल्हा बाहेरूनच परत फिरला.

साधूचे सोंग घेतलेल्या ढोंगी माणसांवर विश्वास ठेवू नये.

What do you think?

11 points
Upvote Downvote
Lakha Padla Prakash Lyrics लख्ख पडला प्रकाश Jaundyana Balasaheb

Lakha Padla Prakash Lyrics | Jaundyana Balasaheb Gondhal Lyrics

Japun Chal Pori Japun Chal Lyrics | Mangesh Padgaonkar Poems in Marathi जपून चाल्‌ पोरी जपून

Japun Chal Pori Japun Chal Lyrics | Mangesh Padgaonkar Poems in Marathi