Mi Majhyakadech Pahil Spruha Joshi Kavita

Mi Majhyakadech Pahil Spruha Joshi Kavita

मी माझ्याकडेच पाहिलं एकटक आणि बघतच राहिले
माझ्यात गुरफटलेल्या तुला..
रेशमाहून मऊ आणि लोखंडी तारांहून कठीण..
मनाच्या धाग्यांमध्ये तू होतास गुंतलेला !!
मला माझ्याभोवती तुला वेढून घ्यायचं होतं,
थंडीमध्ये एकच गोधडी आपण गुंडाळून घ्यायचो ना, तसं काहीतरी !!

तू वेगळी निवड केली असतीस..
तर एकवेळ चाललं असतं मला,
पण निवडीचं दान तू माझ्या पारड्यात टाकलंस
मला कोणतंही स्वातंत्र्य न देता..
तू निघून गेलास.. ठरवल्यासारखा..
आणि तुझं प्रेम मात्र जाणवत राहिलं
आपल्या त्याच जुन्या गोधडीसारखं !!

पण आता हे आहे, ते कायमचं आहे.
तू नसलास तरी ‘ते’ माझ्या भोवती आहे
आणि तू जिथे कुठे असशील
तिथे तुलाही ती ऊब जाणवणारच आहे
माझ्या श्वासासकट !!

आपण मरत नाही पूर्णपणे
कण कण जगत राहतो,
आपण जगतही नाही पूर्णपणे
कण कण मरत राहतो.
तुझ्या नसण्याला
आणि माझ्या असण्याला
हवी असते ती ऊबच..
आपली गोधडी तेवढ्याला पुरेशी आहे..!!


Mi Majhyakadech Pahil Spruha Joshi Kavita lyrics with marathi kavitasangrah. She is famous indian television, film & theatre actress. She is also a poet and lyricist for films.

Get more marathi poems by Spruha Joshi!


What do you think?

2 points
Upvote Downvote
Sankarshan Karhade Kavita | Marathi Poems

Sankarshan Karhade Kavita | Valentine Day Special

Dil Dosti Dobara Lyrics | Title Song | Zee Marathi

Dil Dosti Dobara Lyrics | Title Song | Zee Marathi