Moral Stories in Marathi on Tree | वेडेवाकडे झाड

Moral Stories in Marathi on Tree | वेडेवाकडे झाड

एक जंगल होते. त्या जंगलात एक विचित्र आकाराचे झाड होते. त्याचे खोड आणि फांद्या आडव्यातिडव्या पसरल्या होत्या. या झाडाच्या भोवतालची झाडे उंच व सरळसोट वाढलेली होती. या चॅन आकाराच्या उंच झाडांकडे पाहून वेड्यावाकड्या झाडाला वाटायचे,” ही झाडे किती चॅन आणि सरळसोट आहेत!” मग दुःखी स्वरात ते स्वतःशीच म्हणायचे,” मी किती दुर्दैवी आहे! मी एकटाच असा वेडावाकडा आणि कुरूप का?”

एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या जंगलात आला. वेड्यावाकड्या झाडाकडे पाहून तो म्हणाला,” हे वेडेवाकडे झाड माझ्या अजिबात उपयोगाचे नाही.” मग त्याने छानशी, सरळ वाढलेली काही झाडे निवडली. त्या झाडांवर कुऱ्हाडीचे सपासप घाव घातले आणि ती तोडली.

त्यानंतर मात्र त्या वेड्यावाकड्या झाडाला आपल्या कुरुपतेबद्दल कधीच दुःख झाले नाही. खरे तर कुरुपतेमुळेच ते झाड लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीपासून वाचले होते.

तात्पर्य: आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान माना.


Get more Marathi Stories here!

What do you think?

60 points
Upvote Downvote
Tujhya Yashacha Punav Kusumagraj Marathi Kavita / तुझ्या यशाचा पुनवचांद

Tujhya Yashacha Punav Kusumagraj Marathi Kavita

Paus ala re poems by mangesh padgaonkar

Paus Ala Re Poems By Mangesh Padgaonkar