Enjoy Raindrop Poem Ruskin Bond in Marathi. Translation by Spruha Joshi.
Raindrop Poem Ruskin Bond in Marathi:
हे पान स्वतःतच किती पूर्ण,
पण झाडाचा एक भाग,
आणि हे झाड,
स्वतःतच किती पूर्ण,
पण रानाचा एक भाग..
आणि डोंगर कड्यापासून
पार समुद्रापर्यंत
धावणारं हे रान..
आणि हा समुद्र,
स्वतःतच किती पूर्ण,
पण जातोय थांबून,
देवाजीच्या हातातला
पावसाचा एक थेंब बनून..!!