असा कसा देवाचा देव बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

असा कसा देवाचा देव बाई – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।
देव एका पायाने लंगडा ॥१॥

शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो ।
करी दही-दुधाचा रबडा ॥२॥

वाळवंटी जातो कीर्तन करितो ।
घेतो साधूसंतांशी झगडा ॥३॥

एका जनार्दनीं भिक्षा वाढा बाई ।
देव एकनाथाचा बछडा ॥४॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *