आणायचा माझ्या ताईला नवरा मराठीमध्ये | Aanaycha majhya taila navra Lyrics in Marathi
“आणायचा, माझा ताईला नवरा आणायचा !”
“नको बाई नको, मला नवरा नको.”
“त्याचं खप्पडच नाक, त्याच्या पाठीला वाक
दोन्ही डोळ्यांनी चाकण शोधायचा !”
माझा ताईला नवरा आणायचा !”
” माझा दादाला बायको आणायची !”
“नको बाबा नको, मला बायको नको .”
“लाटण तिच्या हाती, लागे तुझ्या पाठी
भोपळा टुणूक टुणूक तशी चालायची
माझा दादाला बायको आणायची !”
“माझा ताईला नावरा आणायचा !
घाट राहील अशा, मोठ्या दाढी मिशा
बायको उडून जाईल असा घोरायचा
माझा ताईला नवरा आणायचा !”
“माझा दादाला बायको आणायची !
तिचा घसा कसा? गाढव गाई तास .
लाडे लाडे तुझ्याशी बोलायची
माझा दादाला बायको आणायची !”