आरंभी वंदीन अयोध्येचा – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

आरंभी वंदीन अयोध्येचा – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi

आरंभी वंदीन अयोध्येचा राजा ।
भक्तांचीया काजा पावतसे ॥१॥

पावतसे महासंकटीं निर्वाणीं ।
रामनाम वाणी उच्चारितां ॥२॥

उच्चारितां राम होय पापक्षय ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ॥३॥

पुण्यभूमी पुण्यवंतांसीं आठवे ।
पापीया नाठवे कांहिं केल्यां ॥४॥

कांहिं केल्यां तुझें मन पालटेना ।
दास ह्मणे जन सावधान ॥५॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *