आह्मां नकळे ज्ञान – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आह्मां ॥१॥
आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आह्मां ॥२॥
योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥