एक होता काऊ तो – Ek Hota Kau old marathi song Lyrics in Marathi
एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला,
“मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ”
एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला,
“तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट”
एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली,
“तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस, तू माझे अंग पूस”
एक होती गाय, तिने चिमणीला विचारले,
“तुझे नाव काय, तुझे नाव काय, तुझे नाव काय?”
एक होते कासव, ते चिमणीला म्हणाले,
“मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव, मला चड्डी नेसव”