ऐक ऐक सखये बाई- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi
ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगूं काई ।
त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ॥१॥
देवकीनें वाईला यशोदेनें पाळिला ।
पांडवांचा बंदीजन होऊनियां राहिला ॥२॥
ब्रह्मांडाची सांठवण योगीयाचें निजधन ।
चोरी केली म्हणऊन उखळासी बंधन ॥३॥
सकळ तीर्थें जया चरणीं सुलभ हा शूळपाणि ।
राधिकेसी म्हणे तुझी करीन वेणीफणी ॥४॥
शरण एका जनार्दनीं त्रैलोक्याचा [१] मोक्षदानीं ।
गाई गोपी गोपबाळां मेळवीले आपुलेपणीं ॥४॥