कशी जांवू मी वृंदावना- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कशी जांवू मी वृंदावना- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

कशी जाऊं मी वृंदावना ।
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥

पैलतिरीं हरी वाजवी मुरली ।
नदी भरली यमुना ॥२॥

कांसे पीतांबर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥

काय करूं बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥

नंदाच्या हरीनें कौतुक केलें ।
जाणे अंतरींच्या खुणा ॥५॥

एका जनार्दनीं मनीं ह्मणा ।
देवमाहात्म्य कळेना कोणा ॥६॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *