Kiti Sangu Mi Sangu Kunala Lyrics in Marathi
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदी आनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला गं कान्हा आला
अष्टमीच्या राती गं, यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात पैजण थरथरले
कान्हा दिसतॊ उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद …
मूर्ती अशी साजिरी गं, ओठावरती बासरी, भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून, गोप-बाळे जमून
सांज-सकाळी गोपाळ-काला, आज आनंदी आनंद …
खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला, टिपरीवरी टिपरी पडे
लपून छपुन गिरिधारी, मारितो गं पिचकारी, रंगाचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगाच्या धारात न्हाला, आज आनंदी आनंद …