Kilabil kilabil pakshi bolati Lyrics in Marathi
किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुले बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती गाती नाचती, कोणी रडके नाही
नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो पडो धडपडो लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्या हासर्या येती जाती
झाडावरती चेंडु लटकती शेतामधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही