खांद्यावरी घोंगडी हातामध्ये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi
खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी । घेउनिया चारीतसे धेनु सांवळा ॥१॥
राधे तुझा मुकुंद मुरारी । वाजवि वेणू नानापरि ॥२॥
सकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती ।
तो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥
एका जनार्दनीं रचिलें रासमंडळ । जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदलें ॥४॥