चांदनेन चांदनं पीठभर | Chandnyat Chandan Lyrics in Marathi
चांदनेन चांदनं पीठभर चांदनं
चांदुन्या घातिल्या बाजा
या बाजेवर कोन देव निजे गो किस्न देव निजे
राधाबाय घालिते वारा गो बाय राधाबाय घालिते वारा
राधाबायचे वटीने काय गो किस्नाच्या गवलनी बारा
किस्नाच्या गवलनी बारा गो बाय मालंनी मल्ल्यान् गेल्या
मालंनी मल्ल्यान् गेल्या गो बाय फुलांचा करूंडा केला
फुलांचा करूंडा केला गो बाय हौलूचे पूजेला नेला
हौलूबाय, हौलूबाय, तुजे शाराचं नांव काय?
शाराचं नांव मुंबै शार, तुजे गांवाचं नांव काय?
गांवाचं नांव वरली गांव, तुजे पाटलाचं नांव काय?
पाटलाचं नांव शंकर पाटील, तुला ग दोधन् काय
तुला गो दोधन् हंडे पंडे, पालखीन् बैसुन जाय
पालख्या मोरा सतर्या जोरा मी जातंय आजाचे घरा