जया म्हणती नीचवर्ण- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi
जया म्हणती नीचवर्ण । स्त्रीशुद्रादी हीनजन ॥१॥
सर्वांभूतीं देव वसे । नीचा ठायीं काय नसे ॥२॥
नीच कोठोनि जन्मला । पंचभूतां वेगळा जाला ॥३॥
तया नाहीं कां जनन । सवेंचि होत पतन ॥४॥
नीच म्हणोनि काय भुलीं । एका जनार्दनीं देखिली ॥५॥