दीन पतित अन्यायी- Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi
दीन पतित अन्यायी । शरण आलें विठाबाई ॥१॥
मी तों आहें यातिहीन । न कळे कांहीं आचरण ॥२॥
मज अधिकार नाहीं । भेट देई विठाबाई ॥३॥
ठांव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी ॥४॥
दीन पतित अन्यायी । शरण आलें विठाबाई ॥१॥
मी तों आहें यातिहीन । न कळे कांहीं आचरण ॥२॥
मज अधिकार नाहीं । भेट देई विठाबाई ॥३॥
ठांव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी ॥४॥