दूर किनारा राहिला | Dur Kinara Rahila Lyrics in Marathi
दूर किनारा राहिला
बेभान वारा धावला, मांझी रे
तुफानी लाटांनी दर्याच्या थाटांनी
बेधुंद झाली जिंदगी
उदास होउनी असा मी धावुनी
केली प्रभुची बंदगी
या जलधारा जीवनधारा हो, मांझी रे
साथी रे सुखाचे, दिल्याघेतल्याचे
अंती कुणी ना संगती
दुःख झेलता मी, कुणी नाही कामी
सारे दुरुनी पाहती
या जलधारा जीवनधारा हो, मांझी रे