देवासी तो पुरे एक – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi
देवासी तो पुरे एक प्रेमभाव ।
पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥
मनापासूनियां करितां कीर्तन ।
आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥
रामकृष्णहरि उच्चार सर्वदा ।
कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥
एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास ।
सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥