Deva Tujhe Kiti Sundar aakash Lyrics in Marathi
देवा तुझे किती । सुंदर आकाश
सुंदर प्रकाश । सूर्य देतो
सुंदर चांदण्या । चंद्र हा सुंदर
चांदणें सुंदर । पडे त्याचें
सुंदर हीं झाडें । सुंदर पाखरें
किती गोड बरें । गाणें गाती
सुंदर वेलींचीं । सुंदर हीं फुलें
तशीं आम्ही मुलें । देवा, तुझीं