धांव घाली विठू आतां – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
धांव घाली विठू आतां चालूं नको मंद ।
बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला ।
शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥
जोडुनियां कर चोखा विनवितो देवा ।
बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥४॥