ध्यान करु जाता मन – श्री समर्थ रामदास अभंगवाणी Lyrics in Marathi
ध्यान करूं जातां मन हारपलें ।
सगुण तें झालें गुणातीत ॥१॥
जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण ।
करीं चापबाण शोभतसे ॥२॥
राम माझे मनीं राम माझे ध्यानीं
शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥
रामदास ह्मणे विश्रांति मागणें
जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥