नको देवराया अंत आतां – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi
नको देवराया अंत आतां पाहूं
प्राण हा सर्वथा जाऊं पाहे
हरिणीचें पाडस व्याघ्रें धरियेलें
मजलागी जाहलें तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धांवे हो जननी विठाबाई
मोकलुनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात