नाखवा वल्हव वल्हव | Nakhava Valhav Valhav Lyrics in Marathi
झपझप मचवा किनारीं नाखवा, वल्हव वल्हव
नाखवा वल्हव वल्हव
आलो खाडीवर मासं धरायला दूर
सखी काठावर मला पगायला चूर
भरती-सुकतीनं खाडिचा भरून आला ऊर
तिच्या न माझ्या मनामंदी सोसाटलंय काहूर
घावंल मासा जाळ्यामंदी तुझ्या
तुटंल तिळतिळ मनामंदी माझ्या
सुकंल मासा जळाविना
झुरंन मीहि तिच्याविना
अंबर लुकलुकलं नुक्तं तार्यानं
बंदर लखलखलं सम्दं बिजलीनं
तांडेल मी हकडं, होडी ती तकडं !