नाविका रे वारा वाहे रे | Navika Re Vara Vahe Re Lyrics in Marathi
नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हांक जरा आज नाव रे
सांजवेळ झाली आता पैल माझे गांव रे..
आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला
माझा राऊ मनामंदी बोलुनि गेला
धांव घेई बघ माझे मन, नाही त्याला ठाव रे..
नवा साज ल्यायले मी, गौरीवाणी सजले मी, चांदवा ल्याला
माझा जिवू उरामंदी फुलुनी आला
नाचते रे बघ माझे तन, संगं त्याच्या भाव रे..