पुस्तक नंतर वाचा | Pustak Nantar Vacha Lyrics in Marathi Balgeet – Yogesh Khadikar, Rachna Khadikar, Shama Khale Lyrics

Pustak Nantar Vacha Lyrics in Marathi

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

मी बाई फुलराणी, गाईन सुंदर गाणी
फुले भराभरा वेचा, आता खेळा नाचा

फूलपाखरू आले, मला हळूच म्हणाले,
“तू राजा रानाचा !”, आता खेळा नाचा

कानी सुंदर डूल, तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा, आता खेळा नाचा

थेंब दंवाचे करती, चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा, आता खेळ नाचा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *