मल्हारवारी – Malhar wari Song Lyrics in Marathi – अग बाई अरेच्चा 2004
मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून
ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती
गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरूनउधे ग अंबे उधे
उधे ग अंबे उधेहोऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
फुलवितो दिवटी दीपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
उधे ग अंबे उधे
उधे ग अंबे उधे
घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो
भवानी बसली ओठी गळी
आम्ही अंबेचे गोंधळी
सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
घावली मूळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
बोला अंबाबाईचा …. उधो
रेणुकादेवीचा …. ….उधो
एकवीरा आईचा …. उधो
या आदिमायेचा …. उधो
जगदंबेचा …. उधो
महालक्ष्मीचा…………….उधो
सप्तशृंगीचा …………… उधो
काळुबाईचा …. …उधो
तुळजाभवानी आईचा ……….. उधो
0E04YXklAOaE