माझें माहेर पंढरी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

माझें माहेर पंढरी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

माझें माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरीं ॥१॥

बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥

पुंडलिक आहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगूं [१] ॥३॥

माझी बहीण चंद्रभागा ।
करीतसे पाप भंगा ॥४॥

एका जनार्दनीं शरण ।
करी माहेरची आठवण ॥५॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *