Ya Varyachya Basuni Vimani Lyrics in Marathi
या वार्याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबिल अपुल्या इवल्या डोळ्यांची
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशिरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची
कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसताहसता उडते चंगळ तार्यांची
कधी वेळेवर केव्हा उशिरा, अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करिती ना सजा
असे मिळाया गुरुजी आम्हा करू प्रार्थना देवाची