या विठूचा गजर हरिनामाचा – Sant Keshavdas अभंगवाणी Lyrics in Marathi

या विठूचा गजर हरिनामाचा – Sant Keshavdas अभंगवाणी Lyrics in Marathi

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥

उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥

पंचतत्त्वांची गोफण, क्रोध पाखरें जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास ह्मणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *