रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रामनाम ज्याचे मुखीं ।
तो नर धन्य तिनीं लोकीं ॥१॥

रामनाम वदतां वाचें ।
ब्रह्मसुख तेथें नाचे ॥२॥

रामनामें वाजे टाळी ।
महादोषां होय होळी ॥३॥

रामनाम सदा गर्जें ।
कळिकाळ भय पाविजें ॥४॥

ऐसा रामनामीं भाव ।
तया संसाराचि वाव ॥५॥

आवडीनें नाम गाय ।
एका जनार्दनीं वंदी पाय ॥६॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *