विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठलावांचुनीं आणिकाचें ध्यान ।
नाहीं आह्मां चिंतन दुजियाचें ॥१॥

आमुचे कुळीचें विठ्ठल दैवत ।
कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

विठ्ठलावांचुनीं नेणों क्रियाकर्म ।
विठठलावांचुनीं धर्म दुजा नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला ।
भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *