संतपदांची जोड दे रे – संत अमृतराय महाराज अभंगवाणी Lyrics in Marathi
संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥१॥
संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥
सुफलित करुनी पूर्ण मनोरथ ।
पुरविशि जिविंचें कोड ॥३॥
अमृत ह्मणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥