Saju Mi Kashi Lyrics in Marathi
सजू मी कशी? नटू मी कशी?
चोरुन सांग तुला भेटू कशी?
रुप्याचं जोडवं बोटात कचतंय्
तुरुतुरु चालता खण्खण् वाजतंय्
गावाला कळतंय् चालू मी कशी?
लज्जेला लागता वाकडी नजर
गोरट्या हातानं सावरता पदर
काकणांचा गजर थांबवू कशी?
झोकदार नथनी कानात डूल
उरात फुलतंय् चाफ्याचं फूल
वासाची भूल ही छपवू कशी?