ही नाव रिकामी उभी | Hi Naav Rikami Ubhi Lyrics in Marathi
ही नाव रिकामी उभी किनार्याला
मी काशी वल्हवू तुझ्याविना दर्याला ?
या चांदण्यांत लाटा चमकटी रुपेरी रंगानं
खळखळ दरियाची हसणं असेल पिरतीनं
तू येताच नाव माझी –
घेऊन गिरकी लागेल सुरूसुरू धावायला
झणझण झोंबल रातीचा वारा तुझ्या गं अंगाला
जवळ जवळ सरकशील तू मलाच बिलगायला
गुपीत मनचं सांगीन झटकन तुला गं कानाला
क्षणांत कळी तुझी खुलेल गं
मोरावाणी नाव माझी डुलेल
मन माझं फुलेल
हसेल गं , फुलेल गं, नावेत तुझ्यासंगं फिरण्याला