ॐकारस्वरूपा सद्गुरू – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi
ॐकारस्वरूपा सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥
नमो मायबापा गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ॥२॥
मोहोजाळ माझें कोण निरशील ।
तुजवीण दयाळा सद्गुरुराया ॥३॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ॥४॥
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढें उदास चंद्र-रवि ॥५॥
रवि शशि अग्नि नेणती ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणें वेद ॥३॥
एका जनार्दनीं गुरु परब्रह्म ।
तयाचें पैं नाम सदा मुखीं ॥४॥