Shubha Mangal Charani Lyrics in Marathi | शुभ मंगल चरणी गण
शुभ मंगल चरणी गण नाचला
नाचला कसा तरी पाहु चला
सार्या अंगांनी रस आचिवला
छत्तीस रागिन्या बसल्या उशाला
जन सार्या ताला-सुरावर
वर खर खर सम वाचिवला
रोचिवला नवरस सगळा
येचिवला उल्हास आगळा
उगळा निगळा मनोवेगळा खोचला
शुभ मंगल चरणी गण नाचला
गण वाकड्या सोंडेचा
गण हत्तीच्या पिंडाचा
अगं पाऊल पडता त्याचा
छुम छुम छुम छुम छननन
छुम छ्ननन वाजे
घुंगराचा गजर जेथे साचला
शुभ मंगल चरणी गण नाचला
गणपती नाचुनी गेल्या पाठी
शेंदुर ठेवला कोणासाठी
गणपती नाचुनी गेला पाठी हो
शेंदुर ठेवला कोणासाठी
पठ्ठे बापूराव कविची धाटी
हट्टी मराठी बाले घाटी
खबर आणली मग शंभर नंबरी
वर वर वरची भर भर पुढची
शाहूनगरची कोल्हापूरची
पल्ला थेट पंचगंगेला नीट रस्ता पोचला
शुभ मंगल चरणी गण नाचला